निखिल खाडे मदतीची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निखिल खाडे मदतीची गरज
निखिल खाडे मदतीची गरज

निखिल खाडे मदतीची गरज

sakal_logo
By

फोटो - KPC22B10919
....

फुटबॉलपटू निखिलसाठी मदतीची गरज

शस्त्रक्रियेचा खर्च कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : फुटबॉलपटू निखिल खाडे कोल्हापूरचा स्टार गोलरक्षक. सामना कोणाविरुद्धही असो, त्यात तो छाप पाडल्याशिवाय न राहणारा. मोक्याच्या क्षणी अफलातून गोलक्षेत्ररक्षण करण्यात त्याची हातोटी. तो घरात चक्कर येऊन पडल्याचे निमित्त झाले आणि त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊन ठेपली. शस्त्रक्रियेचा खर्च खाडे कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा बनला आहे. त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
तो संभाजीनगरातील रहिवासी आहे. त्याचे वडील दिलीप खाडे रिक्षाचालक असून, निखिल डी. वाय. पाटील संस्थेत कार्यरत आहे. कोल्हापुरातील नामांकित गोलरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळातून त्याने गोलरक्षक म्हणून खेळण्यास सुरवात केली. त्यानंतर तो शिवाजी तरुण मंडळातून खेळला. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा तो कर्णधार होता. या संघातून खेळताना त्याने कामगिरी कमालीची उंचावली. अनेक वर्षे तो याच संघातून खेळत राहिला. दिलबहार तालीम मंडळाकडून तो आता खेळत आहे. त्याच्यावरील शस्त्रक्रियेचा खर्च न पेलवणारा असल्याने खाडे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. पत्नी, वडील, दोन बहिणी आर्थिक विंवचनेत आहेत.
-------------
चौकट
उत्कृष्ट गोलरक्षक

निखिलने छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या अनेक फुटबॉल स्पर्धांत त्याच्या कौशल्याची चुणूक दाखवली. उत्कृष्ट गोलरक्षकाचा मान त्याने अनेकवेळा मिळविला. विशेष म्हणजे ‘सकाळ’तर्फे झालेल्या स्पर्धांतही त्याने त्याचे कौशल्य सिद्ध करत उत्कृष्ट गोलरक्षकाचे बक्षीस मिळविले.
--------------
चौकट
आर्थिक मदतीचे आवाहन

निखिलचा मित्रपरिवार मोठा आहे. त्याच्यावरील शस्त्रक्रियेची माहिती कळताच, अनेकांनी थेट रुग्णालय गाठले. खाडे कुटुंबीयांना आधार दिला. त्याच्या मदतीसाठी सोशल मीडियावर दानशूर व्यक्तींना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.