बिद्री कारखाना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिद्री कारखाना निवेदन
बिद्री कारखाना निवेदन

बिद्री कारखाना निवेदन

sakal_logo
By

64761
....

‘बिद्री’च्या वाढीव शेअर्स
रकमेच्या विरोधात निवेदन
कोल्हापूर, ता. २५ ः बिद्री साखर कारखान्यामार्फत सभासदांची वाढीव पाच हजार रुपये शेअर्स रक्कम ऊस बिलातून कपात न करण्याबाबतची मागणी कारखाना कार्यक्षेत्रातील वीस हजार शेतकरी सभासदांनी साखर सहसंचालक कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
राज्य शासनामार्फत वाढीव पाच हजार रुपये शेअर्स रक्कम आकारण्याबाबत परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन दूधगंगा-वेदगंगा बिद्री कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कपात करत आहे. हा निर्णय सभासद शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने चुकीचा व आर्थिक भुर्दंड घालणारा आहे. साखर सहसंचालकांकडून तत्काळ कारखाना प्रशासनास सभासदांच्या मागणीप्रमाणे वाढीव शेअर्स रक्कम कपात न करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ‘गोकुळ’चे संचालक नंदकुमार ढेंगे, ‘बिद्री’चे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, दत्तात्रय उगले, बाजार समिती संचालक कल्याणराव निकम, माजी उपसभापती अरुणराव जाधव, शामराव भावके, मदन देसाई, केडीसीसी संचालक अर्जुन आबिटकर, माजी सभापती बाबा नांदेकर, बालाजी फराकटे, बाळासाहेब भोपळे, अशोकराव फराक्टे, नंदकुमार पाटील, सुभाष पाटील-मालवेकर, डी. पी. पाटील, सूर्याजी देसाई, जयवंत चोरगे, सुमित चौगले, सरपंच विलास पाटील, राजू वाडेकर, भाऊ पालकर, राजेंद्र चिले, रणधीर शिंदे आदींची स्वाक्षरी आहे.