
बेकायदेशीर करिअर अकॅडमीवर कारवाई करा
बेकायदेशीर करिअर
अॅकॅडमीवर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : इचलकरंजी शहरात एक करिअर ॲकॅडमी बेकायदेशीरपणे सुरू आहे. यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी (इचलकरंजी शहर) यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन केले.
या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संबंधित शिक्षण संस्थेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या ॲकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या मुलांना इतर शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश देण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी संबंधित संस्थेची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र माध्यमिक शिक्षण विभागाने काही कारवाई केली नाही. त्यामुळेच मुख्यालयाच्या आवारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. या संस्थेवर कारवाई केली नाहीतर पुन्हे बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. हे आंदोलन मयूर दाभोळकर, नवनाथ हत्तीकर, जयवंत वडर, विशाल कांबळे, विवेक वडर, शालूमन कांबळे, शाहिद बोरकर, नियाज केकणवाडी यांनी केले.