राजाराम बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम बातमी
राजाराम बातमी

राजाराम बातमी

sakal_logo
By

‘राजाराम’ ची एकरकमी एफआरपी जमा

२२.५० कोटी खात्यावर ः २६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंची रक्कम

कसबा बावडा, ता. २८ ः येथील छत्रपती राजाराम कारखान्यात या वर्षीच्या हंगामात गाळप झालेल्या उसाची एकरकमी एफआरपी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक, ज्येष्ठ संचालक महादेवराव महाडिक यांनी दिली.
यावर्षी कारखाना २६ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. तेव्हापासून १५ नोव्हेंबरपर्यंत कारखान्यात एकूण ७७,५७८ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या उसाची निव्वळ देय एफआरपी प्रतिटन २९०० रुपये होते. त्याप्रमाणे होणाऱ्या ऊस बिलाची रक्कम २२ कोटी ५० लाख रुपये ऊस पुरवठादार शेतकरी सभासदांना त्यांच्या बँकेतील खात्यावर जमा केली आहे. तरी संबंधित ऊस पुरवठादारांनी आपआपल्या बँकेशी संपर्क साधून ऊस बिलाचे पेमेंट घेऊन जावे, असे आवाहन महाडिक यांनी केले आहे.
तसेच या गळीत हंगामासाठी सभासद शेतकऱ्यांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस गळितास पाठवून सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष दिलीप भ. पाटील, उपाध्यक्ष वसंत बा. बेनाडे व सर्व संचालक उपस्थित होते.