योगशिक्षक प्रशिक्षण मेळावा गडहिंग्लजमध्ये उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगशिक्षक प्रशिक्षण मेळावा गडहिंग्लजमध्ये उत्साहात
योगशिक्षक प्रशिक्षण मेळावा गडहिंग्लजमध्ये उत्साहात

योगशिक्षक प्रशिक्षण मेळावा गडहिंग्लजमध्ये उत्साहात

sakal_logo
By

65267
गडहिंग्लज : योगशिक्षक प्रशिक्षण मेळाव्यात बोलताना डॉ. बाबुराव फडके. शेजारी सदानंद वाली, प्रा. सदाशिव कुंभार आदी.

योगशिक्षक प्रशिक्षण मेळावा
गडहिंग्लजमध्ये उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : येथील विद्याधामतर्फे योगशिक्षक रिफ्रेशर कोर्स उत्साहात झाला. डॉ. बाबुराव फडके यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. इस्लामपूरचे प्रा. सदाशिव कुंभार प्रमुख पाहुणे होते.
या वेळी डॉ. फडके म्हणाले, ‘‘मानवी शरीर हे सहज उपलब्ध झालेले नाही. जीवन अमूल्य आहे. त्याचे मोल याच जन्मात ओळखून त्याला सांभाळणे गरजेचे आहे. योगामध्ये केवळ मानवच नव्हे तर देशाला बदलण्याची ताकद आहे. प्रा. कुंभार यांनी वृत्ती, द्वेष, अहंकार, ध्येय, मन, आत्मावर नियंत्रण कसे मिळवावे याविषयी विचार मांडले. योगातील प्रगत अभ्यास, स्वाध्याय कसा करावा आणि विनाऔषधाने दीर्घायुष्यी कसे रहावे याचा मूलमंत्र दिला.’’
सचिन मगदूम यांनी शासकीय योगासन स्पर्धेची माहिती दिली. गारगोटीचे सुरज नलवडे यांनी गुरुकुल काय असते व गुरुकुलातील धडे कसे मिळतात, आत्मसंरक्षण किती महत्वाचे आहे, याची माहिती दिली. प्रा. गुरुलिंग खंदारे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. सदानंद वाली यांनी योगाची महती व योगाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला आकार कसा देता येतो, याविषयी मार्गदर्शन केले. प्रभावती बागी यांनी यौगिक अनुभूती कथन केले. विठ्ठल मोरे यांनी आभार मानले.