श्री दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
श्री दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

श्री दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

दत्त जयंतीनिमित्त
धार्मिक कार्यक्रम
इचलकरंजी, ता. २८ : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास (दिंडोरी प्रणित) नदी वेस नाका, इचलकरंजी यांच्‍या वतीने श्री दत्तजयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह गुरुवार (ता. १) ते गुरुवार (ता. ८) डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. सप्ताह कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रहर सेवा (अखंड विना वादन, जप, श्री स्वामीचरित्र वाचन) अखंडपणे सुरू असणार आहे. श्री गणेश याग, गीताई याग, स्वामी याग, चंडी याग, रुद्र याग, मल्हारी यागासह विविध यज्ञ होतील. सामूहिक श्री गुरुचरित्र पारायण होणार आहे. सामूहिक श्री स्वामीचरित्र सारामृत व श्री दुर्गा सप्तशती पाठ, औदुंबर प्रदक्षिणा, सप्ताह दरम्यान बालसंस्कार, प्रश्नोत्तर मार्गदर्शन, विवाह संस्कार, कृषी, पर्यावरण प्रकृती, स्वयंरोजगारसह आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.