हत्तरकींच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्तरकींच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम
हत्तरकींच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम

हत्तरकींच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम

sakal_logo
By

हत्तरकींच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम
नूल : कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे (गोकूळ) माजी अध्यक्ष राजकुमार हत्तरकी यांची ८१ वी जयंती व विविध मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील एच. बी. हायस्कूलच्या मैदानावर उद्या (ता.२९) दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होईल. कारीमठ हत्तरगी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन होईल. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती रेखाताई हत्तरकी, वीरशैव बँकेचे उपाध्यक्ष सदानंद हत्तरगी यांची प्रमुख उपस्थिती आहे. गोडसाखरचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालकांचा सत्कार केला जाणार आहे. यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हत्तरकी प्रेमी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरदशंकर वरदापगोळ यांनी केले आहे.