अर्बन निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन निवडणूक
अर्बन निवडणूक

अर्बन निवडणूक

sakal_logo
By

65316, 65318

‘अर्बन’च्या अध्यक्षपदावर कणेरकरांची हॅट्‌ट्रिक

बिनविरोध निवड ः उपाध्यक्षपदी जयसिंगराव माने

कोल्हापूर, ता. २८ ः येथील शतकोत्तर परंपरा असलेल्या कोल्हापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा माजी महापौर शिरीष दत्तात्रय कणेरकर यांची, तर उपाध्यक्षपदी जयसिंगराव पांडुरंग माने यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीनंतर झालेल्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत या निवडी झाल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे होते.
अध्यक्षपदासाठी कणेकरकर यांचे नाव संचालक सुभाष भांबुरे यांनी सुचवले, त्यास विश्‍वास काटकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी माने यांचे नाव सुनीता राऊत यांनी सुचवले. त्यास संध्या घोटणे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.
निवडीनंतर कणेरकर व माने यांच्या समर्थकांनी बँकेच्या दारात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. शिंदे यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अर्बन बँकेच्या नूतन संचालकांसह कमर्शिअल बँक, ॲड. शामराव शिंदे सत्यशोधक बँकेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.