Mon, Jan 30, 2023

गड-संक्षिप्त
गड-संक्षिप्त
Published on : 28 November 2022, 2:38 am
जाधवची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी कॉलेजमधील बीएस्सी भाग एकमध्ये शिकणार्या अमृता जाधव हिची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी कुमारी गटातून कोल्हापूर संघात निवड झाली. जिल्हा असोसिएशनतर्फे झालेल्या निवड चाचणीतून तिची निवड झाली. तिला विद्या प्रसाकर मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळी यांची प्रेरणा, कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव बी. जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक महेश घाळी, डॉ. कोल्हापुरे, किशोर हंजी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक विकास अतिग्रे यांचे मार्गदर्शन मिळाले.