शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे व्याख्यान
शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे व्याख्यान

शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे व्याख्यान

sakal_logo
By

फोटो : 65315
...

फुलेंचा सत्यशोधक विचार कालसुसंगत
प्राचार्य डॉ. आनंद मेणसे : शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : ‘नवीन भांडवलशाहीत कामगार नसेल. तिथे रोबो काम करेल, रोबोच उत्पादन करेल. परिणामी, लोकांच्या हातात काम नसेल. यामुळे समाजात भयंकर विषमता वाढेल. भांडवल हे कमीत कमी लोकांच्या हातात केंद्रित होत जाईल. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी कामगार कायदे, शिक्षण, स्त्रिया, दलित, शोषित आदी घटकांसाठी जो सत्यशोधकांचा विचार मांडला तो आजही तितकाच उपयोगी आहे. तो सत्यशोधक विचार कालबाह्य झालेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी केले.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे आज शाहू स्मारक भवनमध्ये आद्य समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. ‘महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व’ यावर डॉ. मेणसे यांनी पुष्प गुंफले. प्रा. डॉ. अशोक चौसाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. मेणसे म्हणाले, ‘आज दहा टक्के लोकांच्या हातात ८० टक्के संपत्ती आहे. महात्मा फुलेंचा शिक्षणावर भर होता; मात्र सध्या शिक्षणासाठी शासनाकडून पैसे देण्याची गरज नाही, असे सांगत आहेत. शिक्षणाचे क्षेत्र स्वायत्ततेच्या नावाखाली जात आहे. देशातील कोणतेही क्षेत्र घ्या. आयटी क्षेत्रात तर किती तास काम करायचे, याचे नियमच नाहीत. १३-१४ तास काम करून घेतले जाते. फुलेंनी कामगार कायद्यांचे नियमन केले. पूर्वी सत्यशोधक पद्धतीने कमी खर्चात लग्ने होत असत. आज ही स्थिती नाही. लग्नात खर्च करण्याची ईर्ष्या वाढत आहे. हाच लग्नाबाबतचा फुलेंचा विचार आज सांगण्याची गरज आहे. लग्न, जत्रेसाठी कर्ज काढले जाई. ते लवकर फिटत नसे. आता लग्नासाठी खासगी सावकार, फायनान्स कंपन्यांकडून पैसे घेतले जातात. सर्व शहरात खासगी सावकारी सुरू आहे. ग्रामीण भागातील वास्तव तर तितकेच भयावह आहे. ते प्रश्‍न आजही सुटलेले नाहीत. दीडशे वर्षांपूर्वी शेतकरी, महिला, कामगार, दलितांची परवडत सुरू होती. यासाठी त्यांचे प्रश्‍न समजून घेऊन फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून ठोस कृती केली. कर्मकांडाच्या निमित्ताने समाजातील घटकांचे शोषण सुरू होते; मात्र आजही कर्मकांडे सुरूच आहेत.’
किशोर खिलारे यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.