तेंडूलकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेंडूलकूर
तेंडूलकूर

तेंडूलकूर

sakal_logo
By

तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला ... लोगो
...
...
10950फोटो
कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर व श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकतर्फे आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत बोलताना खासदार प्रकाश जावडेकर. शेजारी डावीकडून ॲड. राजेंद्र किंकर, ॲड. विवेक शुक्ल, खासदार धनंजय महाडिक, विनोद डिग्रजकर, कृष्णा काशीद, प्रशांत कासार, डॉ. दीपक आंबर्डेकर.
............

मोदी म्हणजे विश्‍वास समीकरण घट्ट

प्रकाश जावडेकर : १ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राममंदिर उभे होईल.

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला न्याय देण्याचे धोरण देशाला प्रगतिपथावर नेईल. मोदी म्हणजे विश्‍वास असे समीकरण घट्ट झाले आहे. त्यांना समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. त्यांनी सांस्कृतिक वैभव परत आणले असून, १ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राममंदिर उभे होईल, असे प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी आज येथे केले. ब्राह्मण सभा करवीर व श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकतर्फे आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलनाने व्याख्यानमालेचे उद् घाटन झाले. ‘मोदी@२१’ विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
जावडेकर म्हणाले, ‘मोदी कधी थकत नाहीत, की कोणाला थकू देत नाहीत. ते जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. परदेशातील दौऱ्यात मोदी गर्दी खेचत होते आणि त्याचे आश्‍चर्य तिथल्या जनतेला वाटत होते. गेल्या आठ वर्षांत एकाही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. यातून त्यांची काम करण्याची हातोटी दिसून येते. एलईडीच्या नऊ वॅट बल्बची किंमत तीनशे रुपये होती. ती मोदींनी सत्तर रुपयांवर आणली. कोरोना काळात देशात तीन लशी तयार करण्यात आल्या. २३० कोटी लोकांना त्याचे डोस देऊन कोरोनाविरुद्ध सुरक्षा कवच उभे केले. ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य पुरवठा केलाच, शिवाय परदेशी लोकांना हस्त कारागिरांच्या वस्तू भेट देण्यास सुरुवात केली. आधुनिक संरक्षण सिद्धता आणली. त्याचे श्रेय मोंदीना जाते.’
यावेळी खासदार धनंजय महाडिक, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल, जयवंत तेंडुलकर, अॅड. राजेंद्र किंकर, डॉ. दीपक आंबर्डेकर उपस्थित होते. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले.
....

चौकट

देशभक्तीची भावना जागृत केली

मोदींनी हर घर तिरंगा उपक्रमातून देशभक्तीची भावना जागृत केली. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार तळागाळातील लोकांना शोधून दिले. लंगडा, बहिरा म्हणून ज्यांची हेटाळणी व्हायची, त्यांना ‘दिव्यांग’ असे नाव दिले. मागासलेल्या ११५ जिल्ह्यांना आकांक्षी जिल्हे असे नामकरण केले. मोदींच्या नेतृत्वगुणांची चर्चा नेहमीच होते. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे कोणीच २०२४ च्या निवडणुकीची चर्चा करत नाही, असे जावडेकर यांनी सांगितले.
...