बसस्थानक परिसर सुरक्षित करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसस्थानक परिसर सुरक्षित करावा
बसस्थानक परिसर सुरक्षित करावा

बसस्थानक परिसर सुरक्षित करावा

sakal_logo
By

बस स्थानक परिसर सुरक्षित करावा
शिवसेनेची मागणी ः आजरा आगारप्रमुखांना निवेदन
आजरा, ता. २ ः बस स्थानक परिसरात अकारण फिरणाऱ्यांकडून विद्यार्थिनी व महिलांना त्रास वाढला आहे. बस स्थानक सभोवतालचे संरक्षक भिंत उंच नसल्याने कोणीही कुठून येत असून सुरक्षितता धोक्यात आली आहे. अकारण फिरणाऱ्यांवर कारवाई व भिंत उंच करून समोरील दोनच प्रवेशद्वारातून प्रवाशांना ये- जा रहावी. यातून बस स्थानक परिसर सुरक्षित करावा; अशी मागणी आजरा शिवसेनेने केली. याबाबतचे निवेदन आजरा आगारप्रमुखांना दिले.
आजरा बस स्थानक परिसरात तालुक्यातील विविध गावांतील प्रवासी येतात. महिला व विद्यार्थिनीची संख्या अधिक असते. बस स्थानक परिसरात काही दिवसांपासून चुकीच्या गोष्टी घडत आहेत. महिला स्वच्छतागृहात शूटिंगसाठी मोबाईल ठेवला होता. सतर्क महिलेमुळे हा प्रकार उघड झाला. संबंधित व्यक्ती बस स्थानकाच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेली. बस स्थानकात खिसे कापणे, मोबाईल चोरी, अश्‍लील चाळे असे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी आगार प्रशासनाने प्रयत्न करावेत. बस स्थानकाभोवती संरक्षक भिंत उभारावी. अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, युवासेना शहरप्रमुख सागर नाईक, विभागप्रमुख दिनेश कांबळे, गटप्रमुख सीताराम पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.