मॅग्नेट प्रकल्पातून महिलांना रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅग्नेट प्रकल्पातून महिलांना रोजगार
मॅग्नेट प्रकल्पातून महिलांना रोजगार

मॅग्नेट प्रकल्पातून महिलांना रोजगार

sakal_logo
By

मॅग्नेट प्रकल्पातून महिलांना रोजगार
---
सात हजार शेतकऱ्यांना लाभ; फळ प्रक्रियेस मिळणार चालना
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : शेतकऱ्याच्या शेतीमालाचे नुकसान टाळून त्यांना जास्तीचा नफा कमवून देण्यासाठी उपयुक्त ठरणारा एक हजार २०० कोटीचा मॅग्नेट प्रकल्प राज्यासह कोल्हापूर विभागात राबविला जाणार आहे. त्यासाठी दहा शेतकरी कंपन्यांची निवड झाली असून, येत्या मार्चपासून प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू होईल. यातून जवळपास सात हजारांवर महिला शेतकऱ्यांना लाभ होईल. या प्रकल्पात राष्ट्रीय स्तरावर प्रक्रिया मालाच्या पुरवठादार आघाडीच्या कंपन्या सहभागी होत आहेत. राज्य पणन महामंडळाच्या सहयोगाने जिल्ह्यात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
शेतकरी शेतीमालाचे उत्पादन घेतो, हेच उत्पादन बाजारपेठेत विकले जाते. यातून काही वेळा नफा, तर काही वेळा तोटा होतो. अशा पारंपरिक पद्धतीने शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार होतो. त्यासाठी शेतीमाल बाजारपेठेत नेईपर्यंत बहुतांश शेतीमालाचे नुकसान होते. कधी शेतीमालाची काढणी करणे, पॅकिंग करणे, वाहतूक व तोलाई करणे, थप्पी लावणे, बाजारपेठेत भाव मिळेल याची प्रतीक्षा करणे या काळात शेतीमालाचे नुकसान होते. असे नुकसान टाळून शेतीमाल अचूकपणे निवडून चांगल्या दर्जाच्या पॅकिंगमधून त्याची विक्री करण्यासाठी विक्री व्यवस्थापन साखळी तयार करण्याचा हा मॅग्नट प्रकल्प आहे.
यात शेतकरी आपला शेतीमाल शेतीमाल उत्पादक कंपन्यांना देतील. तेथे प्रशिक्षित कामगार शेतीमालाचे वर्गीकरण करतील, तसेच शक्य त्या मालावर प्रक्रिया होईल. अशा प्रक्रियेचा शेतीमाल खरेदीदार किंवा निर्यातदार जादा दराने विकत घेतील. त्यातील नफा कंपनी व शेतकऱ्यांना दिला जाईल, असे या योजनेचे स्वरूप आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा विभागासाठी हा प्रकल्प मंजूर झाला. त्याचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यात मिरची, केंळी, भेंडी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, सीताफळ, पेरू, चिक्कू असा फळ माल शेतकऱ्यांकडून घेतला जाईल. यावर प्रक्रिया करण्यासाठी दहा कंपन्यांची निवड झाली आहे. प्रकल्पासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील सात हजार फळ उत्पादक शेतकरी जोडले जातील. त्यांचा शेतीमाल काढून त्याचे सुरक्षित व अचूक वजन पॅकिंग करून त्या मालाचे ब्रँडिंग राज्यभरात केले जाईल. यासाठी शेतकरी कंपनी व प्रक्रिया उद्योग, खरेदीदार निर्यातदारांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल. अशा शेतकरी प्रक्रिया कंपनीत नोकरीसाठी अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण आहे. तसेच, जास्तीत जास्त महिलांना रोजगार देण्यात येईल.
------------
कोट
देशात वर्षाला ४० हजार कोटी, राज्यात तीन हजार ५०० कोटींचे, तर विभागात अंदाजे ८०० कोटींच्या शेतीमालाचे नुकसान होते, असे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना प्रकल्पात आहेत. शेतीत सध्या अनेक महिला काम करतात. मात्र, त्यांना प्रशिक्षण नसल्याने काही वेळा शेतीमाल काढणी ते बाजारपेठ या टप्प्यात सर्वाधिक शेतीमालाचे नुकसान होते. हे नुकसान टाळून शेतीमालाचा विनियोग होईल. शेतकऱ्यांचा लाभ वाढेल, असे प्रशिक्षण असेल. यातून महिला व पुरुषांना काम मिळेल. असा उद्देश सफल व्हावा, यासाठी लवकरच प्रशिक्षण सुरू करीत आहोत.
- डॉ. सुभाष घुले, विभागीय व्यवस्थापक, पणन महामंडळ