शिवाजी विद्यापीठ राजेश क्षीरसागर बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठ राजेश क्षीरसागर बैठक
शिवाजी विद्यापीठ राजेश क्षीरसागर बैठक

शिवाजी विद्यापीठ राजेश क्षीरसागर बैठक

sakal_logo
By

65939

विद्यापीठाचे प्रश्न सोडवण्यासाठी
प्रयत्न करू ः राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, ता. १ ः शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न व सहकार्य करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज दिली. क्षीरसागर यांनी आज विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत विविध विषयांबाबत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी क्षीरसागर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्य जुन्या पुणे-बंगळूर महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजू यांना जोडण्यासाठी भुयारी मार्गाची मोठी आवश्यकता आहे. याखेरीज विद्यापीठ हवामान बदल, गूळ संशोधन आदींबाबतही संशोधन व विकासाचे काम करीत आहे. या सर्व उपक्रमांना मदत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. विद्यापीठाने या संदर्भात शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करू. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करू.’’
प्रभारी कुलसचिव व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी आर. वाय. लिधडे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. पवार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, संगणक केंद्र संचालक अभिजित रेडेकर, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. डी. के. मोरे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार उपस्थित होते.