सीपीआर वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर वृत्त
सीपीआर वृत्त

सीपीआर वृत्त

sakal_logo
By

६५९८६
कोल्हापूर ः जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे एड्स दिनानिमित्त आयोजित प्रभातफेरीच्या उद्‍घाटनप्रसंगी सौरभ चौगुले, डॉ. प्रदीप दीक्षित यांच्यासह मान्यवर.
---------------------------

मुक्त संवाद साधून
एचआयव्ही रोखूया
---
सौरभ चौगुले; ‘सीपीआर’मध्ये कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : संवादाच्या माध्यमातून योग्य माहिती घेऊन ‘एचआयव्ही’सोबत जगणाऱ्या संसर्गितांना समानतेची वागणूक देऊया. जेणेकरून त्यांचे जगणे ससह्य होईल, अशी अपेक्षा अभिनेते सौरभ चौगुले यांनी व्यक्त केली.
जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे एड्स दिनानिमित्त आयोजित प्रभातफेरीच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित अध्यक्षस्थानी होते.
अभिमान संस्थेचे विशाल पिंजानी एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी शून्यावर आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘‘आपली एकता आणि समानता एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता असावी हे यावर्षीचे एड्स दिनाचे ब्रिदवाक्य आहे.’’ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक हुबेकर यांनी उपस्थितांना एड्समुक्ती आणि कलंक व भेदभाव दूर करण्याची शपथ दिली. भित्तिचित्र स्पर्धांचे पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. तसेच, २०२३ च्या आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकर हिच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी प्रभातफेरीत सहभागी झाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. विनायक भोई, सहायक आरोग्य अधिकारी मनीष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, अधिसेविका नेहा कापरे, निरंजन देशपांडे प्रमुख उपस्थित होते. विनायक देसाई यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद चौधरी यांनी आभार मानले.