बांबूमधून शाश्वत उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबूमधून शाश्वत उत्पन्न
बांबूमधून शाश्वत उत्पन्न

बांबूमधून शाश्वत उत्पन्न

sakal_logo
By

बांबूमधून शाश्वत उत्पन्न
सतीश कांबळे; चिमणेत भूमी शेतकरी उत्पादक गटाची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
उतूर, ता. ९ : चिमणे (ता. आजरा) येथे भूमी शेतकरी उत्पादक गटाचे उद्‍घाटन उत्साहात झाले. हिरण्यकेशी बांबू ग्राम विकास शेतकरी गट पेरणोलीचे सचिव सतीश कांबळे यांनी बांबू पीक व प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. निवृत्त खादी ग्रामोद्योग अधिकारी एच. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
श्री. कांबळे म्हणाले, ‘‘बांबू हे पीक पर्यावरण रक्षणासोबतच शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळले पाहिजे. बांबू लागवडीसोबत बांबूवर प्रक्रिया करणारे उद्योग भागात उभे राहिले तर यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन शहरांकडे होणारे तरुणांचे स्थलांतर थांबू शकते. भूमी शेतकरी उत्पादक गटाने गटाचे मुख्य पीक म्हणून बांबूची निवड केली असून चिमणे परिसरात होऊ घातलेल्या बांबू लागवडीमुळे चिमणेची ओळख बांबूचे गाव म्हणून होईल.’’
कृषी पर्यवेक्षक विजयसिंह दळवी यांनी रोजगार हमी योजनेतून बांबू लागवड याविषयी माहिती दिली. सहायक कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तालुका समन्वयक अमित यमगेकर यांनी भूमी शेतकरी गट हा आत्मा अंतर्गत कार्यरत झाला असून कृषी विभागाकडून तांत्रिक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. निवृत्त खादी ग्रामोद्योग अधिकारी श्री. पाटील, रणजित कालेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कृषी सहायक श्री. बिकड, महादेव तारळेकर, जनार्दन तारळेकर, शिवाजी नांदवडेकर, प्रकाश शिंदे, महादेव नादवडेकर, महादेव आजगेकर, भाऊ तारळेकर आदी उपस्थित होते. बाबासो पाटील यांनी स्वागत केले. भूमी शेतकरी उत्पादक गटाचे अध्यक्ष वसंत तारळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय खेडेकर यांनी आभार मानले.