Tue, Feb 7, 2023

घरफाळा नोटीस
घरफाळा नोटीस
Published on : 1 December 2022, 6:02 am
वापरात बदल केलेल्या
१० मिळकतींना नोटीस
कोल्हापूर, ता. १ : महापालिकेच्या घरफाळा विभाग व परवाना विभागाने सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत आज १० मिळकतींचा अनिवासी वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांना नोटीस दिली आहे. गांधी मैदानअंतर्गत १५ मिळकतींची तपासणी झाली. ५ मिळकतींना कराची आकारणी झालेली आहे, तर १० मिळकतींना नोटीस लागू केली आहे. छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत १२ मिळकतींची तपासणी झाल्यानंतर त्यांना अनिवासी कर आकारणी सुरू आहे. छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत केलेल्या तपासणीत ५७ मिळकतींना अनिवासी कर आकारणी सुरू असल्याचे दिसून आले.