निम्म्या शहराला आज अपुरे पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निम्म्या शहराला आज अपुरे पाणी
निम्म्या शहराला आज अपुरे पाणी

निम्म्या शहराला आज अपुरे पाणी

sakal_logo
By

निम्म्या शहराला आज अपुरे पाणी
शिंगणापूर केंद्रातील एक पंप बंद; ए, बी, ई वॉर्डला फटका
कोल्हापूर, ता. १ : शिंगणापूर पाणी उपसा केंद्राकडील एक पंप अचानक बंद पडला आहे. दुरुस्तीसाठी एक दिवस लागणार असल्याने शुक्रवारी (ता. २) या केंद्रातून पाणी उपसा कमी होणार असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या ए, बी, ई वॉर्डमध्ये कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.
शिंगणापूर पाणी उपसा केंद्राकडील ४३५ अश्‍वशक्तीच्या चार पंपपैकी एक बिघाडामुळे अचानक बंद पडला. दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले असून एक दिवस लागणार आहे. त्यामुळे या केंद्राकडील पाणी उपसा कमी होऊन या केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ए, बी, वॉर्डमधील लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर टाकी परिसर, शिवाजी पेठ परिसर, महाद्वार रोड परिसर, मंगळवार पेठेतील काही भागात अपुरा पुरवठा होईल. ई वॉर्डमधील राजारामपुरी, उद्यमनगर परिसर, साईक्स एक्स्टेन्शन, प्रतिभानगर, वैभव सोसायटी, शांतिनिकेतन परिसर, गोळीबार मैदान, उलपे मळा, नागाळा पार्क परिसर, लोणार वसाहत परिसर, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड परिसर, कावळा नाका, शाहूपुरीतील चार गल्ली, व्यापारपेठ परिसर यांसह आजूबाजूच्या परिसरात पाणीपुरवठा अपुरा होणार आहे. महानगरपालिकेने टॅंकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन केले असल्याचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले आहे.