मंत्री लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री लोढा यांच्यावर 
गुन्हा दाखल करा
मंत्री लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा

मंत्री लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा

sakal_logo
By

65912
कोल्हापूर ः शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना निवेदन देताना संजय पवार रविकिरण इंगवले, विजय देवणे, हर्षल सुर्वे, सुनील मोदी आदी.

मंत्री लोढा यांच्यावर
गुन्हा दाखल करा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीचे निवेदन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण आणि निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना दिले. मंत्री लोढा यांनी प्रतापगडावरील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या बंडाशी केली. त्याचा संदर्भ घेऊन हे निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळातील जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी भाजपवर टीका केली. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात निवेदन देण्याचे पूर्वनियोजित होते. तेथे निरीक्षक कटकधोंड यांनी निवेदन घेतो पण तातडीने गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आज दौऱ्यावर असलेल्या पोलिस महासंचालक रजनीश सेट यांची भेट घेण्याची भूमिका घेतली. यानंतर उपअधीक्षक चव्हाण ठाण्यात पोचले. त्यांनी निवेदन स्वीकारून योग्‍य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.
शिष्टमंडळात शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, किरण पडवळ, सुरेश पोवार, अवधूत साळोखे, संभाजी भोकरे, सरदार पाटील, अवधूत साळोखे, संजय धुमाळ, किशोर दाभाडे, सुरेश कदम, रजणित आयरेकर, उदय सुतार, धनाजी यादव, धोंडिबा कानूरकर, अक्षय ओतारी, राजू जाधव, विशाल देवकुळे, अक्षय घाटगे यांचा समावेश होता.