केएमटीप्रश्‍नी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटीप्रश्‍नी बैठक
केएमटीप्रश्‍नी बैठक

केएमटीप्रश्‍नी बैठक

sakal_logo
By

तोट्यातील केएमटी फेऱ्यांचा
कृती समितीतर्फे आज आढावा
कोल्हापूर, ता. १ ः तोट्यातील फेऱ्यांबाबत उद्या (ता. २) कोल्हापूर नागरी कृती समितीची केएमटी प्रशासनासोबत बैठक होत आहे. दुपारी चार वाजता केएमटी कार्यालयात बैठक होत आहे. यामध्ये केएमटीने केलेल्या पाहणीतून काय समोर आले, याचा आढावा घेतला जाईल.
उत्पन्न नसतानाही केएमटी विविध गावांत तोट्यात बस सोडत असल्याने त्या बंद करण्याची मागणी कृती समितीने केली होती. त्यानंतर काही गावांच्या बस बंद केल्या. तसेच तोट्यातील फेऱ्यांचा गावनिहाय लेखाजोखा मागितला होता. त्यासाठी दिवाळीनंतर केएमटीने पाहणी चालवली होती. त्यासाठी प्रत्येक गावच्या फेऱ्यांसाठी कर्मचारी नेमून माहिती संकलन सुरू होते. त्यातून १३ हून अधिक गावांच्या फेऱ्यांची माहिती संकलित झाली. प्रशासकांकडे ती माहिती दिली होती. त्या माहितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी चार वाजता कृती समिती केएमटी कार्यालयात जाईल. २१ मार्गांवर केएमटी बस धावतात. दोन ते तीन मार्ग सोडल्यास इतर सर्व तोट्यातील मार्ग आहेत. ते बंद करावेत, अशी मागणी आहे. संकलित माहितीवर समिती पुढील दिशा ठरवेल.