महासंचालक रजनिश सेठ दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महासंचालक रजनिश सेठ दौरा
महासंचालक रजनिश सेठ दौरा

महासंचालक रजनिश सेठ दौरा

sakal_logo
By

65980
कोल्‍हापूर ः राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर आले असून, त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील कामकाजाची माहिती घेतली. शेजारी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अधिकारी

पोलिस महासंचालकांनी घेतला कामकाजाचा आढावा
कोल्हापूर, ता.१ ः पोलिस महासंचालक रजनीश सेठ आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयासह उपधीक्षक कार्यालयाची पाहणी केली. वार्षिक निरीक्षणाचा भाग म्हणून त्यांचा हा दौरा आहे. उद्याही ते कोल्हापुरात असून, ग्रामीण भागातील एका पोलिस ठाण्यास भेट देणार असल्याचे समजते. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही त्यांच्याकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.
पोलिस दलाचे राज्याचे प्रमुख म्हणून पोलिस महासंचालक सेठ कार्यरत आहेत. वार्षिक तपासणीच्या निमित्ताने ते आज आणि उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आमगन झाले. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. तेथे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून कार्यालयाची माहिती घेतली. यामध्ये मंत्रालयीन, गुन्हे, सायबर, आर्थिक, जिल्हा विशेष शाखेला भेटी देवून कामकाजाची माहिती घेतली. तसेच तपासणीचा एक भाग म्हणून आज दुपारनंतर त्यांनी शनिवार पेठेतील शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी उपअधीक्षकांसह शहरातील पोलिस ठाण्यातील निरीक्षकांची ही बैठक घेवून गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर ते विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयाकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.