जळीतग्रस्त इंदिरानगर- ऋतूराज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळीतग्रस्त इंदिरानगर- ऋतूराज पाटील
जळीतग्रस्त इंदिरानगर- ऋतूराज पाटील

जळीतग्रस्त इंदिरानगर- ऋतूराज पाटील

sakal_logo
By

65988

इंदिरानगर नुकसानग्रस्तांसाठी
तात्पुरता निवारा उभारू

ऋतुराज पाटील; लवकरच बैठकीची ग्वाही

कोल्हापूर, ता. १ ः शिवाजी पार्क इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मंगळवारी लागलेल्या भीषण आगीमुळे २२ झोपड्या जळून खाक झाल्या. या नुकसानग्रस्ताच्या घरांबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासोबत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. मात्र, तोपर्यंत तातडीने तात्पुरत्या शेड उभारून या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. आमदार पाटील यांनी आज या झोपडपट्टीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
हातावरची पोटं असणारा हा समाज असून १९७२ पासून ही झोपडपट्टी अस्तित्वात आहे. येथील रहिवाशांना कायमस्वरूपी पक्की घरे मिळावीत, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबांनी केली. सोनझारी समाजाचे अध्यक्ष मारुती सोनझारी, तानाजी मोरे, रोहित जाधव, सुरेश सोनझारी, मारुती सोनझारी, बाजीराव सोनझारी, शिवाजी सोनझारी, मनोज सोनझारी उपस्थित होते.