
मोदींसमवेत बैठकीसाठी प्रयत्न ः धैर्यशील माने
मोदींसमवेत बैठकीसाठी
प्रयत्न ः धैर्यशील माने
इचलकरंजी, ता. १ : कर्नाटक व महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत
व्यापक बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली. या बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित असतील, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. किमान समान कार्यक्रम ठरवून यातून मार्ग काढण्याचा आग्रह राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाने त्यांची सीमाप्रश्नावर तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. सध्या न्यायालयात महाराष्ट्राची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरीष साळवे मांडत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ विधी तज्ज्ञांची टिम मदत करण्यासाठी नियुक्त केल्याचेही खासदार माने यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.