कर्ज यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्ज यादी
कर्ज यादी

कर्ज यादी

sakal_logo
By

प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी बुधवारपर्यंत
बँकांकडून अपलोड : दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याच्या दुसऱ्या यादीचे काम पूर्ण झाले आहे. ही यादी बुधवार (ता. ७) पर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून दुसऱ्या यादीची सुरू असलेली प्रतीक्षा संपणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ३५३ शेतकऱ्यांची नावे अपलोड केली होती. यापैकी पहिल्या यादीत १ लाख २९ हजार २६० शेतकरी पात्र ठरले. त्यांना सुमारे ४०९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. दरम्यान, नावात बदल, आधार कार्ड नंबर व बँक खाते क्रमांक चुकीचा नोंद केल्यामुळे सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना पहिल्या यादीत लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत दुसऱ्या यादीची प्रतीक्षा सुरू ठेवली. २ नोव्हेंबरला ही यादी प्रसिद्ध होईल, असा अंदाज असताना डिसेंबर उजाडला तरीही यादीचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या एक महिन्यात लाखो शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करून नव्याने अपलोड केल्या आहेत. त्या याद्या शासनाकडे पाठवल्या आहेत. त्यानुसार तीन ते चार दिवसांत या याद्या नव्याने प्रसिद्ध केल्या जातील.
....

`याद्यांमध्ये असलेल्या त्रुटी दूर केल्या आहेत. बँकांकडून या याद्या अपलोडही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुधवार (ता. ७) पर्यंत नव्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक