अस्वच्छ कामगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्वच्छ कामगार
अस्वच्छ कामगार

अस्वच्छ कामगार

sakal_logo
By

२१ विद्यार्थ्यांना मिळाली
तीन वर्षांची शिष्यवृत्ती

गडहिंग्लज, ता. २ : येथील चर्मकार समाजाच्या पाठपुराव्यामुळे २१ विद्यार्थ्यांना तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली. त्याबद्दल कोल्हापूर समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांना पेढे भरवून सत्कार केला. यावेळी बालाजी वसाहतीत शिबिरही झाले.
अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या पाल्यांना पहिली ते दहावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. २०१८ पासून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने तीन हजारपर्यंत वाढ केली आहे. यासाठी चर्मकार समाजाने पाठपुरावा सुरू ठेवला होता. तालुका, जिल्हा, राज्य लोकशाही दिनातही वेळोवेळी मागणी केली. याशिवाय समरजित घाटगे यांच्या जनता दरबाराच्या माध्यमातूनही निवेदने देऊन लक्ष वेधले होते. या लढ्याला यश येऊन तीन वर्षांपासूनची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली.
समाजकल्याण निरीक्षक श्री. टोणपे, श्री. पाटील, श्री. बेंनाले यांची उपस्थिती होती. शिष्यवृत्ती लाभार्थी नेहा कुरिया हिने पेढा भरविला तर प्रियांका चोगुले, लालसिंग बिलावर आणि आनंद बिलावर यांनी अधिकाऱ्यांचा सत्कार केला. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी कातडी कमविण्याच्या कारखान्याला भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, शिबिरात जातीचा दाखला, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गरजू लाभार्थीनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन केले. वामन बिलावर यांनी प्रास्ताविक केले. व्यंकटेश बिलावर यांनी आभार मानले.