राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विराट मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विराट मोर्चा
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विराट मोर्चा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विराट मोर्चा

sakal_logo
By

हिवाळी अधिवेशनात राष्‍ट्रवादीचा मोर्चा

हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २ : नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ३) शाहू मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी भवन येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. या वेळी आजी-माजी आमदार, खासदार यांच्यासह, पक्षाचे पदाधिकारी, पक्ष निरीक्षक व प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीस जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी, सर्व विधानसभाध्यक्ष आणि पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी यांनी उपस्‍थित रहावे, असे आवाहन शहर, जिल्‍हा राष्‍ट्रवादीकडून करण्यात आले आहे.