
गड-संक्षिप्त
फोटो क्रमांक GAD२३.JPG
66015
गडहिंग्लज : बसवराज आजरी यांचा सत्कार करताना डॉ. बेळगुद्री. शेजारी सुरेश कोळकी, राजशेखर दड्डी, शारदा आजरी, नरेंद्र भद्रापूर आदी.
-----------------------------------------------------------------------
बसवेश्वरांना अभिवादनाद्वारे
संघटनात्मक कामाला प्रारंभ
गडहिंग्लज ः राज्य लिंगायत संघर्ष समितीचे गडहिंग्लज तालुका नूतन अध्यक्ष बसवराज आजरी यांनी समाजबांधवांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर पुतळ्याला अभिवादन करुन संघटनात्मक कामास प्रारंभ केला. महेश आरभावी, रमेश रिंगणे, श्रीमती शारदा आजरी यांची भाषणे झाली. डॉ. एम. एस. बेळगुद्री, नागाप्पा कोल्हापुरे, काशिनाथ घुगरे, नरेंद्र भद्रापूर, दयानंद खन्ना, दयानंद पाटील, बी. बी. पाटील, महेश तुरबतमठ, बाळासाहेब गुरव, बाळासाहेब घुगरे, प्रवीण मेणसे, पापू रामनकट्टी, राहुल शिरकोळे, महोदव मुसळे, सुधीर पाटील, निखील पट्टणशेट्टी, जवाहर घुगरे, गुंडू पाटील, सचिन पाटील, श्रीकांत यरटे, अनिकेत बेल्लद उपस्थित होते. श्री. आजरी यांचेही भाषण झाले. सर्वांच्या सहकार्याने समाजोन्नतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. वीरशैव समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी यांनी स्वागत तर पुतळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी प्रास्ताविक केले.
------------------------------------------------------
GAD२४.JPG
66016
गडहिंग्लज : वाचन प्रेरणा उपक्रमांतर्गत मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी साने गुरुजी वाचनालयाला भेट दिली.
-------------------------------------------------------------------
मुलांच्या वसतिगृहातर्फे वाचन प्रेरणा उपक्रम
गडहिंग्लज : छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृती वर्षाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातर्फे वाचन प्रेरणा उपक्रम आयोजित केला होता. पालिकेच्या पूज्य सानेगुरुजी मोफत वाचनालयास विद्यार्थ्यांनी भेट देवून विविध पुस्तकांचे अवलोकन केले. उपलब्ध पुस्तकांची माहिती घेतली. अधीक्षक पी. यू. पाटील व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले होते.
---------------------------------------------------------------
GAD२५.JPG
66017
गडहिंग्लज : रेडेकर स्कूलमध्ये आयोजित नेतृत्व विकास शिबिरप्रसंगी अंजना तुरंबेकर व सहभागी विद्यार्थिनी.
------------------------------------------------------------------
रेडेकर स्कूलमध्ये नेतृत्व विकास शिबिर
गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर पब्लिक स्कूलमध्ये सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी नेतृत्व विकास शिबिर झाले. एएफसीच्या प्रशिक्षिका व एटी फाऊंडेशनच्या प्रमुख अंजना तुरंबेकर यांनी मार्गदर्शन केले. तरुण मुलींनी सकारात्मक राहून ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन तुरंबेकर यांनी केले. यावेळी तुरंबेकर यांनी मुलींकडून प्रात्यक्षिके करुन घेतली. स्कूलच्या व्यवस्थापिका स्नेहल रेडेकर, मुख्याध्यापिका अलका साळोखे, शिक्षक उपस्थित होते. अंजना तुरंबेकर यंाचा सत्कार रेडेकर संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्याहस्ते झाला. संस्थाध्यक्षा श्रीमती अंजना रेडेकर यांचे प्रोत्साहन मिहाले. क्रीडा शिक्षक इम्राण बांदार यांनी आभार मानले.
---------------------------------------------------------------
जागृतीमध्ये उद्योजकता विकास मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील जागृती कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्होकेशनल विभागात उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिर झाले. अॅडव्हेंटेज कंपनीचे कार्यकारी संचालक रामचंद्र तोडकर मार्गदर्शक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कंपनीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. नोकरीच्या विविध संधीही सांगितल्या. प्राचार्य विजयकुमार चौगुले अध्यक्षस्थानी होते. अभिजीत गायकवाड, मयूर रेणुसे, नंदिनी पाटील, व्होकेशनल विभागप्रमुख प्रा. रमेश पाटील यांची भाषणे झाली. उपप्राचार्या अनिता चौगुले, प्रा. किरण वाघमोडे, प्रा. प्रियांका कदम, प्रा. गौतम कांबळे आदींसह विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. प्रा. रोहन हत्ती यांनी तांत्रिक सहाय्य केले. प्रा. गुरुलिंग खंदारे यांनी आभार मानले.