
पीएम निधी वितरण
पीएम स्वनिधी कर्जप्राप्त फेरीवाल्यांना
परिचय बोर्डचे प्रशासकांकडून वितरण
कोल्हापूर, ता. २ : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून कर्ज प्राप्त झालेल्या शहरातील फेरीवाल्यांना व्यवसायाच्या ठिकाणी लावण्यासाठी शासन परिचय बोर्ड व प्रधानमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र आले आहे. या परिचय बोर्डाचे वितरण शुक्रवारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाले.
कोरोनात आर्थिक अडचणीत आलेल्या फेरीवाल्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना केंद्र शासनाने सुरू केली. महापालिकेने मागील दोन वर्षात ७, ३९२ लाभार्थ्यांना बँकेमार्फत तब्बल ९ कोटी ५२ लाख रुपये कर्ज दिले. जून २०२० पासून योजनेला सुरुवात झाली. ९६२७ फेरीवाल्यांचे कर्जासाठी आलेले अर्ज पात्र झाले. ८०६४ फेरीवाल्यांना कर्ज मंजूर झाले. ७३९२ फेरीवाल्यांना खात्यात जमा झाले आहे. ५४०४ लाभार्थ्यांनी १० हजार कर्ज घेतले असून, १९३५ लाभार्थ्यांनी वीस हजार कर्ज घेतले आहे. पुढील टप्यात ५३ लाभार्थ्यांनी ५० हजार कर्ज घेतले. कार्यक्रमास उपायुक्त शिल्पा दरेकर, व्यवस्थापक निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर उपस्थित होते.