बचत गटांना निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटांना निधी
बचत गटांना निधी

बचत गटांना निधी

sakal_logo
By

66191

११ बचतगटांना २२ लाखांचे बीज भांडवल
कोल्हापूर, ता. २ ः दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गतच्या अकरा बचत गटांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी २२ लाखांच्या बीज भांडवलाच्या धनादेशाचे वितरण आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाले.
शहरातील ११ बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे. त्यांना २२ लाखांचे कर्जरूपी बीज भांडवल उपलब्ध करुन दिले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये २२ बचत गटांचे बीज भांडवल प्रस्ताव ऑनलाईन पोर्टलद्वारे शासनास सादर करण्याचे उद्धिष्ट होते. यासाठी महापालिकेने ३१ बचत गटांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यातील ११ बचत गटांचे प्रस्ताव मंजूर झाले. या बचत गटांना खाद्य उद्योग व्यवसायासाठी बीज भांडवलाची रक्कम जमा झाली आहे. स्वानंदी बचत गटाला पापड उद्योगासाठी दोन लाख, श्री रामसमर्थ बचत गटाला लाडू तयार करणे, विक्रीसाठी दोन लाख, कलावती बचत गटाला फरसाण व पापड उद्योगासाठी एक लाख ६० हजार, दिव्यशक्ती बचत गटासाठी भडंग व पापड तयारच्या उद्योगासाठी दोन लाख, शीतल बचत गटास फरसाण, शेव, पापडी उद्योगासाठी एक लाख ६० हजार , रमामाता बचत गटास पापड, कुरडई, मच्छी व्यवसायासाठी दोन लाख, अहिल्यामाता बचत गटास पापड, कुरडई उद्योगासाठी एक लाख ६० हजार, हिरकणी बचत गटास तिखट सांडगे तयार करण्यासाठी ८० हजार, वीरमाता बचत गटास चकली व पापड उद्योगासाठी अडीच लाख, जान्हवी बचत गटास लाडू तयार करणे व विक्रीसाठी चार लाख व साईदत्त बचत गटास शेवया तयार व विक्री उद्योगासाठी दोन लाखांचे बीज भांडवल दिले आहे. यासाठी उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक विजय तळेकर, रोहित सोनुले, निवास कोळी, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर यांनी परिश्रम घेतले.