मनसे ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे ठिय्या
मनसे ठिय्या

मनसे ठिय्या

sakal_logo
By

विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाची
अतिरिक्त आयुक्तांचे तक्रार

कोल्हापूर, ता. २ ः टिंबर मार्केट कमानीजवळील भाजीविक्रेत्यांच्या शेडबाबत तोडगा निघालेला असताना महापालिकेने पुन्हा कारवाईचा इशारा दिल्यानंतर मनसेच्या नेतृत्वाखालील विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे जाऊन तक्रार केली.
मोठ्या संख्येने जमलेल्या शिष्टमंडळाने राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली देसाई यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. पुन्हा काहींच्या सूचनेनुसार कारवाई करण्याचा इशारा महापालिकेची यंत्रणा देत आहे. त्याकडे लक्ष वेधत त्या रस्त्यावर काही अडचण नसताना ही कारवाई हेतपुरस्सर केली जात असल्याची तक्रार केली. बाजूपट्ट्या करायच्या असतील तर त्यावेळी तेथील विक्रेते दुसऱ्या बाजूला बसतील. अडथळा येऊ देणार नाहीत असे आश्‍वासन दिले. या चर्चेनंतर कारवाई होणार नाही असे आश्‍वासन देसाई यांनी दिल्याचे राजू जाधव यांनी सांगितले.