संरक्षक कठडा तुटल्याने वाहतूक धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संरक्षक कठडा तुटल्याने वाहतूक धोकादायक
संरक्षक कठडा तुटल्याने वाहतूक धोकादायक

संरक्षक कठडा तुटल्याने वाहतूक धोकादायक

sakal_logo
By

ich26.jpg
66119
इचलकरंजी : काळा ओढ्यावर असलेल्या पुलाचा संरक्षण कठड्याचा भाग तुटलेल्या अवस्थेत आहे.

संरक्षक कठडा तुटल्याने वाहतूक धोकादायक
बोहरा मार्केट परिसरातील काळ्या ओढ्यावरील चित्र; तातडीने दुरुस्ती आवश्यक

इचलकरंजी, ता. २ : येथील बोहरा मार्केटच्या समोरील असलेल्या काळा ओढ्यावर असलेल्या पुलाचा संरक्षण कठड्याचा भाग तुटला आहे. परिणामी, वाहतुकीसाठी ही बाब धोकादायक बनली आहे. याबाबत महापालिकेकडून तातडीने दुरुस्ती न केल्यास दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून अवजड वाहनांसह दुचाकींची वर्दळ असते. त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
शहरातील बोहरा मार्केट हे प्रमुख कापड व्यापारी केंद्र आहे. मार्केटकडे जाताना काळा ओढा लागतो. येथे पुलांची उभारणी केली असून त्यावर संरक्षण कठडा बांधला आहे. कठड्यावर आडव्या व उभ्या लोखंडी पाईप बसवल्यामुळे हा कठडा अधिक सुरक्षित झाला आहे. पण काही दिवसांपूर्वी लोखंडी पाईपचा मधील भाग तुटला आहे. अज्ञात वाहनांच्या धडकेमुळे हा भाग तुटला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा परिसर वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. या परिसरात माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. वळणाचा रस्ता असल्यामुळे रात्री अनेकवेळा चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे हा परिसर वाहतुकीसाठी अधिक धोकादायक बनला आहे.
ओढ्याला मिळणाऱ्या सारण गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत. विशेष म्हणजे या नजीकच्या परिसरात एका मोठ्या रुग्णालयासह मोठी नागरी वसाहत आहे. असे असतानाही महापालिकेकडून येथे स्वच्छता करण्याबाबत दुर्लक्ष होत आहे. सांडपाणी साचून नागरिकांच्या घरात घुसत आहे. डासाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया यासारखे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
--------
तक्रारीनंतरच येते महापालिकेला जाग
ओढ्याला मिळणाऱ्या सारण गटारीतील दुर्गंधीमुळे परिसरातील लहान मुले आजारी पडत आहेत. येथील नागरिकांनी सारण गटार स्वच्छ होण्यासाठी वेळोवेळो तक्रार केली आहे. मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या वेळी काही प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. मात्र पुन्हा येथे कचरा साचलेला दिसत आहे.