
निधन वृत्त
६६१८६
इंदूबाई गुरव-चिरमिरे
कोल्हापूर : शिवाजी पेठ, मरगाई गल्लीतील श्रीमती इंदूबाई रंगराव गुरव-चिरमिरे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. जि.प. शिक्षण विभागातील महेंद्र गुरव यांच्या आई तर मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव यांच्या त्या सासू होत. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ३) आहे.
६६१८७
सुनंदा सूर्यवंशी
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, निकम गल्लीतील श्रीमती सु़नंदा भीमराव सूर्यवंशी (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ३) आहे.
६६१८८
इंदूबाई जाधव
कोल्हापूर : वडणगे, जाधव मळा येथील श्रीमती इंदूबाई केशव जाधव (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ३) आहे.
६६१९२
जयसिंग साठे
कोल्हापूर : रुई (ता. हातकणंगले) येथील जयसिंग रामा साठे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
02484
शिवाजी तारदाळे
सिद्धनेर्ली ः बामणी (ता. कागल) येथील शिवाजी मधुकर तारदाळे (वय ५२) यांचे निधन झाले. ते पार्थसारथी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य होत. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ५) आहे.
००७०१
शांताबाई पाटील
प्रयाग चिखली ः येथील शांताबाई ईश्वरा पाटील (वय ९५) यांचे निधन झाले. जुन्या पिढीतील पंढरपूरच्या व्रतस्थ वारकरी म्हणून त्या परिचित होत्या. येथील निवृत्ती पाटील व ज्ञानदेव पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
०२४८६
पांडुरंग पाटील
सिद्धनेर्ली ः व्हन्नूर (ता. कागल) येथील पांडुरंग नाथा पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, चार नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ३) आहे.
01800
आक्काताई पाटील
हळदी ः कोथळी (ता. करवीर) येथील आक्काताई रंगराव पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांचा मागे मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.
04405
आदम शेख
जयसिंगपूर : येथील विक्रम चित्रमंदिरचे मालक आदम युसूफ शेख (वय ८२) यांचे निधन झाले. महाराष्ट्र को-ऑप. एज्युकेशन बोर्डचे ते माजी प्राचार्य होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
66176
ईश्वर कांबळे
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील ईश्वर आकाप्पा कांबळे (वय 78) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.