ग्राहक पंचायतची गगनबावड्यात शाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहक पंचायतची 
गगनबावड्यात शाखा
ग्राहक पंचायतची गगनबावड्यात शाखा

ग्राहक पंचायतची गगनबावड्यात शाखा

sakal_logo
By

66204
गगनबावडा : नामपलकाचे उद्‍घाटन करताना गटविकास अधिकारी माधुरी परीट.

ग्राहक पंचायतची
गगनबावड्यात शाखा
गगनबावडा, ता. ४ : येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची तालुका शाखा स्थापन करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी भास्कर माने यांची, तर उपाध्यक्षपदी तुकाराम पडवळ यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील यांनी कार्यकारिणीची नावे जाहीर केली. अध्यक्षस्थानी राज्य सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील होते. याबाबत येथील परशुराम विद्या मंदिरात विशेष सभा झाली.
गगनबावड्याच्या गटविकास अधिकारी माधुरी परीट प्रमुख उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नामफलकाचे उद्‍घाटन झाले व निवडीची पत्रे देण्यात आली. तसेच महाआवास अभियानामध्ये गगनबावड्याचा राज्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल परीट यांचा सत्कार करण्यात आला. त्या म्हणाल्या, ‘‘ग्राहकाचे अज्ञान, संघटनाचा अभाव या मुळे ग्रामीण नागरिकांना जास्त फसवले जाते. ही फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहकानी सजग राहण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज असते. ती या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.’’
जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील यांनी ग्राहक चळवळीतील अनुभव कथन केले. तालुक्याचे सुपुत्र, राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील म्हणाले, ‘‘माझ्या तालुक्यात शाखा नाही याची खंत सदैव वाटत होती. ती आज पूर्ण झाली. संवाद व समन्वयात ग्राहक कल्याण आहे हे समजून घेतले पाहिजे. कार्यशाळा, मेळावे घेऊन ग्राहकात जागृती केली जाईल.’’ अन्य कार्यकारणी अशी; संघटक-गुरुनाथ कांबळे, सहसंघटक-पांडुरंग जाधव, सहसंघटक-डॉ. मेघा राणी जाधव, सचिव-विलास पाटील, सहसचिव-सरदार पाटील, कोषाध्यक्ष-राजेंद्र कांबळे, प्रसिद्धी प्रमुख-चंद्रकांत पाटील, सल्लागार-आनंदा पाटील, सल्लागार-तानाजी पाटील, सदस्य-नामदेव चौधरी.
या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदर्गे, जिल्हा संघटक सुरेश माने, पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव निकम, अध्यक्ष भास्कर माने, सहसंघटक डॉ. मेघा राणी जाधव, सहसचिव सरदार पाटील, संघटक गुरुनाथ कांबळे, रवी सुतार, पठाण यांनी मनेगत व्यक्त केले. सुरेश माने यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. सरदार पाटील यांनी आभार मानले. बैठकीला गजानन वापीलकर, रघुनाथ पाटील, संभाजी सुतार, बाजीराव तळेकर, भिवाजी कांबळे, स्वप्निल वरेकर, नंदा रोकडे, रवी सुतार उपस्थित होते.