
‘माईसाहेब’ पुस्तिकेचे आज प्रकाशन
‘माईसाहेब’ पुस्तिकेचे आज प्रकाशन
कोल्हापूर : पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधीने प्रकाशित केलेल्या ‘माईसाहेब’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी (ता. ४) होत आहे. डॉ. प्रिया दंडगे यांनी या पुस्तिकेत माईसाहेबांचा हा प्रवास शब्दबद्ध केला आहे. माई साहेबांच्या जन्मदिनीच बालशिक्षण तज्ज्ञ सुचिताताई पडळकर यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली श्री रामचंद्रपंत अमात्य बावडेकर सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होत आहे. माईसाहेब यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारचे बालवाडीचे शैक्षणिक साहित्य बनिवले आहे. त्याचे प्रदर्शनही ठेवले आहे, अशी माहिती पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधीच्या अध्यक्षा नीतूदेवी बावडेकर, उपाध्यक्ष नीलराजे बावडेकर, विश्वस्त डॉ. उद्धव पाटील, अश्विनीताई वळिवडेकर, प्रीती कट्टी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.