
विभागीय फुटबॉल स्पर्धेत शहाजी महाविद्यालय विजेता
66250
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विभागीय फुटबॉल स्पर्धेतील विजेता श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा फुटबॉल संघ.
विभागीय फुटबॉल स्पर्धेत
शहाजी महाविद्यालय विजेता
कोल्हापूर : वारणानगर येथील तात्यासो कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय फुटबॉल स्पर्धेत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपदासह (कै.) रामराव मुळीक चषकावर नाव कोरले. अंतिम सामन्यात स. ब. खाडे महाविद्यालयावर तीन विरुद्ध एक मैदानी गोल नोंदवून शहाजी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तत्पूर्वी उपांत्य सामन्यात भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयावर चार विरुद्ध शून्य गोलने मात केली. स्पर्धेदरम्यान संघनायक प्रतीक बदामे, प्रभू पोवार, प्रथमेश हेरेकर, रोहित पोवारसह सर्वांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. विजेत्या संघास संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, सचिव विजयराव बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, जिमखानाप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, प्रशिक्षक विश्वास कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले.