कॉमन एज्युकेशन संबंधित बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉमन एज्युकेशन संबंधित बातम्या
कॉमन एज्युकेशन संबंधित बातम्या

कॉमन एज्युकेशन संबंधित बातम्या

sakal_logo
By

राष्ट्रीय लोक जनशक्तीतर्फे
महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रम
कोल्हापूर : राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीतर्फे बिंदू चौक येथे मंगळवारी (ता. ६) डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बिंदू चौक येथे सोमवारी (ता. ५) रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत भीम अनुयायी यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ६) सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यातील गायक कलाकार, संगीतकारांतर्फे भीमबुद्ध गीतांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येईल. सायंकाळी सहा ते रात्री ११ या वेळेत सलाम संविधान प्रस्तुत ‘भीमाभिवादन’ गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते, महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
---------------
66261
कोल्हापूर : १९७४-७५ बॅचमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापिका व्ही. एल. डेळेकर.

‘तवनाप्पा पाटणे’मध्ये डिजिटल क्लासरूम
कोल्हापूर : तवनाप्पा पाटणे हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्‌घाटन झाले. प्रशालेत दोन डिजिटल रूम्स उभारल्या आहेत. १९७४-७५ च्या माजी विद्यार्थी बॅचने एका डिजिटल क्लासरूमची जबाबदारी घेतली. दुसरी क्लासरूम दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या मदतीने केली. त्यासाठी पालकांनी सहकार्य केले. २००१-०२ च्या बॅचने पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले. डिजिटल क्लासरूमचे उद्‌घाटन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले. सहकार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापिका व्ही. एल. डेळेकर यांच्या हस्ते झाला. शीतल राईलकर आणि माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यू. आर. देशपांडे यांनी स्वागत केले. एस. बी. गोंधळी यांनी आभार मानले. एस. व्ही. हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कोषाध्यक्ष जी. एस. जांभळीकर उपस्थित होते.
-------------------
66264
ीोकोल्हापूर : विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.

नूतन मराठी विद्यालयाचे यश
कोल्हापूर : कोल्हापूर वस्तुसंग्रहालय आणि यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे जागतिक वारसा सप्ताहानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांत नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यामध्ये वेशभूषा स्पर्धेत द्वितीय-तेजस्विनी नाकील, उत्तेजनार्थ-इंद्रायणी मराठे, श्रुती पाटील, ओंकार बैरागी, अनुज गुरव यांनी, चित्रकला स्पर्धेत उत्तेजनार्थ- विनायक जाधव, प्रथमेश नाटेकर, मयुरेश गडकरी यांनी, तसेच निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ- यश गडकरी यांनी यश मिळविले. मुख्याध्यापक डी. ए. शिंदे, जिमखाना प्रमुख आर. एन. कुंभार, तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------

‘अवनि’च्या उबदार कपडे
संकलन उपक्रमास प्रतिसाद
कोल्हापूर : जिल्ह्यातील वंचित, वीटभट्टी आणि साखर कारखान्यांवरील ऊसतोड कामगारांच्या चिमुकल्यांसाठी थंडीच्या बचावापासून संरक्षण व्हावे, यासाठी अवनि संस्थेने एक हात आपुलकीचा हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये स्वेटर, ब्लँकेट, उबदार कपडे आदी साहित्य भरभरून दिले जात आहे. हे जमा झालेले साहित्य अवनि संस्था जिल्ह्यातील १५०० बालकांपर्यंत पोहोचविणार आहे. आतापर्यंत दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीसाठी अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी आभार व्यक्त केले. अजूनही लोकांनी मदत करावी, असे आवाहन केले आहे. हा उपक्रम सहा डिसेंबरपर्यंत सुरू आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत दसरा चौक, मुस्लिम बोर्डिंग येथे तसेच जिवबानाना जाधव पार्क येथील अवनि कार्यालयात, रात्र निवारा परीख पूलशेजारी एकटी संस्था येथे कपडे दान करता येतील. उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा येथे हा उपक्रम सुरू असून संयोजन इम्रान शेख, साताप्पा मोहिते, अनिकेत कदम, अक्षय पाटील, अमर कांबळे, रवी कुऱ्हाडे, तसेच अन्य कर्मचारी करत आहेत.
----------------
66267
कोल्हापूर : यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी एम. एस. देशमुख, एल. व्ही. चव्हाण.

भारती विद्यापीठ इंजिनिअरिंगचे यश
कोल्हापूर : भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्टस् असोसिएशनतर्फे रामचंद्र पॉलिटेक्निक पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारात यश मिळविले. यामध्ये आयुष पाटीलने ४५.९० मीटर भालाफेक करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच लट्टे पॉलिटेक्निक सांगली येथे मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेमधील उंच उडी प्रकारात हिना मुजावर हिने उपविजेतेपद पटकावले. विजेत्या खेळाडूंना क्रीडा संचालक लालासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. सांगली महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एस. देशमुख, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.