निवृत्त पोलिस कर्मचारी -डीजी निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त पोलिस कर्मचारी -डीजी निवेदन
निवृत्त पोलिस कर्मचारी -डीजी निवेदन

निवृत्त पोलिस कर्मचारी -डीजी निवेदन

sakal_logo
By

फोटो66309
....

पोलिस कुटुंब आरोग्य योजना तहयात मिळावी
---
निवृत्त पोलिस असोसिएशनचे महासंचालकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः पोलिस कुटुंब आरोग्य योजना किमान पती व पत्नीसाठी तहयात सुरू ठेवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा आणि संघटनेसाठी पोलिस मुख्यालय किंवा कवायत मैदानावर किमान २५० चौरस फुटांची खोली मिळावी, अशा मागण्यांचे निवेदन काल (ता. २) पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना देण्यात आले. छत्रपती शाहू निवृत्त पोलिस कल्याणकारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, की असोसिएशन नोंदणीकृत असून, एक हजार ३५१ पोलिस अधिकारी- कर्मचारी सभासद आहेत. कोल्हापूर जिल्हा व परिसर त्याचे कार्यक्षेत्र आहे. असोसिएशनतर्फे अधिकारी- कर्मचारी व कुटुंबीयांसाठी शासकीय रुग्णालयात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. यात वैद्यकीय, योग, निवृत्तीनंतरचे जीवन अशा विषयांवर मार्गदर्शनही केले जाते. असोसिएशनच्या सभासदांना एकत्रित बैठका घेण्यासाठी कार्यालयाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे किमान २५० चौरस फुटांची जागेची व्यवस्था व्हावी. तसेच, आरोग्य योजनाही पती-पत्नीसाठी तहयात सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत.
शिष्टमंडळात निवृत्त सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर पाटील, ज्येष्ठ निवृत्त पोलिस निरीक्षक बाळासाहेब गवाणी, निवृत्त पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राऊत आणि पंढरीनाथ मांढरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.