बांधकाम परवान्यात सुसूत्रतेसाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम परवान्यात सुसूत्रतेसाठी
तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करा
बांधकाम परवान्यात सुसूत्रतेसाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करा

बांधकाम परवान्यात सुसूत्रतेसाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करा

sakal_logo
By

11024
कोल्हापूर : बांधकाम व्यवसायाशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आणि ‘क्रीडाई’चे पदाधिकारी.

बांधकाम परवान्यासाठी तज्ज्ञ अधिकारी द्या
विद्यानंद बेडेकर; पालिकेत बैठक, ऑनलाईन परवाने वेळेत देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : बांधकाम परवानगीच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची व कर्मचारी याची नियुक्ती करावी. तसेच मोठ्या बांधकामाचे ऑनलाईन परवाने वेळेत मिळावेत, अशा मागण्या ‘क्रिडाई’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी केल्या. महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ‘क्रिडाई’च्या सभासदांना बांधकाम संबंधित योणाऱ्या समस्या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. स्थायी समिती हॉल येथे बैठक झाली.
बैठकीत घरफाळा, नगररचना विभागातील असणारा अपुरा कमचारी व त्याच्या उपस्थितीबाबत, ऑनलाईन बिल्डिंग परवानगी, फायर ना हरकत दाखला, घरफाळा ना हरकत दाखला, पाणीपुरवठा ना हरकत दाखला, ड्रेनेज ना हरकत दाखला, इनाम जमिनीचे ‘लेआऊट डेमाक्रेशन’चे रेखांकनास मंजुरी, टी. डी. आर. युटीलायझेशन तसेच वृक्ष समिती, तिसरा विकास आराखडा या मुद्यावरती सविस्तर चर्चा झाली.
या वेळी अध्यक्ष बेडेकर व पदाधिकारी यांनी बांधकाम परवानगीमध्ये सुसूत्रता येण्यासाठी व मोठ्या बांधकामाच्या ऑनलाईन परवानग्या वेळेत मिळाव्यात. यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची व कर्मचारी याची नियुक्ती करावी. तसेच नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दुपारच्या सत्रात कार्यालयात थांबणे बंधनकारक करावे. बांधकाम परवानगीसाठी लागणारे विविध नाहरकत दाखले त्वरित मिळावेत, अशा विविध मागण्या मांडल्या. यानंतर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वकामे वेळेत निर्गत करण्याचे आदेश दिले व याची पूर्तता करण्याचे आश्‍वासन दिले.
बैठकीला उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक रचनाकार रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, चीफ फायर ऑफिसर तानाजी कवाळे, उद्यान अधीक्षक समीर व्याघ्यांबरे, क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष चेतन वसा यांच्यासह प्रदीप भारमल, गौतम परमार, श्रीधर कुलकर्णी, निखिल शाह, पवन जामदार, के. पी. खोत, श्रेयांश मगदूम, संदीप मिरजकर, अजय डोईजड, महेश पोवार, गणेश सावंत, लक्ष्मीकांत चौगुले, श्रीराम पाटील, महेश यादव, सत्यजित कदम, विलास रेडेकर आदी क्रिडाईचे सभासद उपस्थित होते.