
जळीतग्रस्त झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी बैठक घ्या : क्षीरसागर
जळीतग्रस्त झोपडपट्टीवासीयांच्या
पुनर्वसनासाठी बैठक घ्या : क्षीरसागर
कोल्हापूर : शिवाजी पार्क परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीतील भीषण आगीत २४ झोपड्या जळून खाक झाल्या. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी घराची मागणी आणि पुनर्वसनासंदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून पंचनामे आणि भरपाईसंदर्भात चर्चा केली. क्षीरसागर यांनी आज जळीतग्रस्तांची भेट घेतली. तेथूनच त्यांनी पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले. क्षीरसागर यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधून मदती संदर्भात तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या. महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, सोनझारी समाजाचे अध्यक्ष मारुती सोनझारी, शिवाजी सोनझारी, दिलीप सोनझारी, सुभाष सोनझारी, बाजीराव सोनझारी, माजी नगरसेवक आशिष ढवळे, शिवसेना उपशहरप्रमुख विश्वजित मोहिते, मुकुंद सावंत, संदीप चिगरे, कौस्तुभ उपाध्ये, युवराज देशमुख, विशाल नैनवाणी उपस्थित होते.