चेतन दोडवाड यांच्या छायाचित्राला पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेतन दोडवाड यांच्या छायाचित्राला पुरस्कार
चेतन दोडवाड यांच्या छायाचित्राला पुरस्कार

चेतन दोडवाड यांच्या छायाचित्राला पुरस्कार

sakal_logo
By

66328
....

चेतन दोडवाड यांच्या
छायाचित्राला प्रथम पारितोषिक
कोल्हापूर ः मुंबईओग्राफी समूहातर्फे मुंबईतील जहॉंगीर आर्ट गॅलरीत छायाचित्र प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे. या प्रदर्शनात येथील हौशी छायाचित्रकार चेतन शशी सुरेश दोडवाड यांच्या ‘ये तेरा घर ये मेरा घर’ या छायाचित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. रोहिंटन मेहता यांच्या हस्ते त्यांना हे पारितोषिक देण्यात आले. कुठलाही क्षण कॅमेऱ्यात टिपताना कल्पकता, दृष्टी आणि संयम लागतो. जे दोडवाड यांच्या छायाचित्रातून दिसते, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले. दरम्यान, सहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. जगभरातील छायाचित्रकारांतून एकूण ४२ कलाकृती प्रदर्शनासाठी निवडल्या आहेत. एकाच वर्षात दुसऱ्यांदा जहॉंगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनात दोडवाड यांचे छायाचित्र लागले आहे. वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षीपासून त्यांनी हौस म्हणून छायाचित्रणाचा छंद जोपासला आहे.