Mon, March 27, 2023

जैन श्रावक संघाची
निवडणूक बिनविरोध
जैन श्रावक संघाची निवडणूक बिनविरोध
Published on : 3 December 2022, 6:02 am
जैन श्रावक संघाची
निवडणूक बिनविरोध
इचलकरंजी, ता. ४ : येथील श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नऊ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी जागेइतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी असिफ शेख यांनी जाहीर केले. नुतन कार्यकारी मंडळाची बैठक होऊन अध्यक्षपदी रमेशकुमार जैन, उपाध्यक्षपदी राहुल बोरा, सेक्रेटरीपदी जयंतीलाल सालेचा, खजिनदारपदी गौतमचंद मुथा, सहसेक्रेटरीपदी घिसुलाल पारख, विश्वस्तपदी श्रीकांत चंगेडिया, संजय गुगळे, राजेश भंडारी, अभिजित पटवा यांची, तर स्वीकृत सदस्य दीपक बेदमुथा, भरत बोरा यांची निवड झाली