गड-हिरण्यकेशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-हिरण्यकेशी संवाद
गड-हिरण्यकेशी संवाद

गड-हिरण्यकेशी संवाद

sakal_logo
By

gad46.jpg
66364
कोल्हापूर : हिरण्यकेशीचा नदी संवाद यात्रेत समावेश करण्याबाबतचे निवेदन राजेश क्षीरसागर यांना देताना संजय संकपाळ.
----------------------
हिरण्यकेशीचा नदी संवाद
यात्रेत समावेशाची मागणी
गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीचा नदी संवाद यात्रेत समावेश करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख संजय संकपाळ यांनी केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना तसे निवेदनही दिले. आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतून हिरण्यकेशी वाहते. आंबोलीत उगम असून ती कर्नाटकात घटप्रभा नदीला जाऊन मिळते. गाळ व वाळूमुळे नदीची खोली कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदी पात्राबाहेर पडते. पुरामुळे शेतकरी, रहिवाशांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. नदीची खोली वाढविण्याची गरज आहे. शहरासह गावागावांतील सांडपाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. नदी संवाद यात्रेव्दारे गावात व शहरात प्रबोधन करुन हिरण्यकेशी नदीला चांगले स्वरूप प्राप्त करुन देता येईल. गाळ व वाळू काढून नदीची खोली वाढवता येईल. या सर्वांचा विचार करुन हिरण्यकेशीचा नदी संवाद यात्रेत समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.