Sun, Feb 5, 2023

`साई इंटरनॅशनल’चे यश
`साई इंटरनॅशनल’चे यश
Published on : 4 December 2022, 11:16 am
‘साई इंटरनॅशनल’चे यश
गडहिंग्लज : येथे झालेल्या तालुकास्तरीय गोळाफेक स्पर्धेत साई इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. रोहित नांदूलकर याने प्रथम क्रमांक पटकावून कॉलेजच्या यशात मानाचा तुरा खोवला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. संस्थाध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, प्राचार्या दीपाली कोरडे, क्रीडाशिक्षक सुभाष तिप्पे यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल रोहित याचा महाविद्यालयातर्फे गौरव केला.