माईसाहेब पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माईसाहेब पुस्तक प्रकाशन
माईसाहेब पुस्तक प्रकाशन

माईसाहेब पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

66546

माईसाहेबांची तत्त्‍वे अंगिकारावीत
सुचिता पडळकर; माईसाहेब पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ‘‘श्रीमंत माईसाहेब बावडेकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘माईसाहेब’ हे पुस्तक शिक्षक, संस्थाचालकांनी निश्चितच वाचावे. त्यांनी बालकांना ज्ञान देताना ज्या गोष्टी जोपासल्या त्या गोष्टी निश्चितच आत्मसात करता येतील. माईसाहेबांनी जे सांगितले आहे ते आचरणात आणावे’’, असे आवाहन सृजन आनंद विद्यालयाच्या सुचिता पडळकर यांनी केले. आज डॉ. प्रिया दंडगे लिखित ‘माईसाहेब’ या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत माईसाहेब बावडेकर शाळेत त्यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘रामचंद्रपंत अमात्य यांच्यापासून शिक्षणाची परंपरा बावडेकर घराण्यात रुजली आहे. बालवयात चांगले शिक्षण मिळाले तर त्या बालकांचे भविष्य उज्‍ज्वल होते, हे माईसाहेबांनी जाणले. मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली.’’
डॉ. दंडगे म्हणाल्या, ‘‘हे पुस्तक लिहिताना माईसाहेब उलगडत गेल्या. त्यांनी शांतपणे काम करत शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र व चांगले बदल घडविले.’’
श्रीमंत माईसाहेब बावडेकर शाळेच्या अध्यक्षा नीतूदेवी बावडेकर, नीलराजे बावडेकर, विश्वस्त अश्विनी वळिवडेकर, प्रिती कट्टी आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विश्वस्त डॉ. उद्धव पाटील यांनी केले. उर्मिला माने यांनी सूत्रसंचालन केले.