शहराचा दहा कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहराचा दहा कोटीचा निधी
शहराचा दहा कोटीचा निधी

शहराचा दहा कोटीचा निधी

sakal_logo
By

मनपाला १० कोटींचा निधी मिळणार?
शिंदे सरकारच्या स्थगितीला उच्च न्यायालयाची स्थगिती; रस्ते कामांना मदत शक्य

कोल्हापूर, ता. ४ ः जुन्या सरकारने मंजूर केलेल्या विकासकामांना शिंदे सरकारने दिलेल्या स्थगितीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे महापालिकेची थांबलेल्या १० कोटींच्या कामांना निधी मिळणार की न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडणार याकडे लक्ष लागले आहे. हा निधी मिळाल्यास शहरातील खराब झालेले प्रमुख रस्ते करण्यासाठी मदत होऊ शकते.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना शहरातील मूलभूत सुविधांसाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. ११ एप्रिलला नगरविकास खात्याने दहा कोटींचा निधी मंजूर केल्याचे दोन अध्यादेश काढले होते. या निधीचे प्रामुख्याने रस्त्यांसाठी प्रयोजन केले होते. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरातील खराब झालेले रस्ते करण्याचे नियोजन केले होते. दरम्यान, शिंदे सरकार सत्तेवर आले. या सरकारने पाठीमागील सरकारने मंजूर केलेल्या विविध कामांना स्थगिती देण्याचा आदेश सहा जुलैला काढला. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रस्तावित कामे थांबली. यामध्ये महापालिकेसाठीही मंजूर झालेल्या या दहा कोटींच्या अध्यादेशाचाही समावेश होता.
याबाबत न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मंजूर कामांना रद्द करता येणार नाही, असे सांगत नवीन सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली. यामुळे महापालिकेचा मंजूर झालेला दहा कोटींचा निधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सरकारच्या पातळीवरून पुढे कशा हालचाली होतात, यावर हा निधी हातात पडणार आहे. महापालिकेला निधी मिळाल्यास रखडलेली किमान प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लागू शकतात.

चौकट
१०१ कोटींकडे डोळे
नगरोत्थान योजनेतून रस्ते कामांसाठी १०१ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत नाही, तोपर्यंत महापालिकेला रस्त्यांची कामे करणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेचे डोळे या निधी मंजुरीकडे लागले आहेत. तत्पूर्वी हा निधी मिळाल्यास किमान काही रस्त्यांची दुरवस्था दूर करता येऊ शकणार आहे.