पाचगावात विवाहितेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचगावात विवाहितेची आत्महत्या
पाचगावात विवाहितेची आत्महत्या

पाचगावात विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By

पाचगावात नवविवाहितेची आत्महत्या

कोल्हापूर ः पाचगावमधील पूजा बच्चान गाडगीळ (वय २३, रा. घर नं. १२०, गाडगीळ कोपरा, पाचगाव) या नवविवाहितेने घराच्या तुळीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबतची फिर्याद कृष्णात बापू गाडगीळ यांनी दिली. शनिवारी (ता. ३) दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पूजाने गळफास घेतला, त्यावेळी घरात कोणी नव्हते. काही वेळाने नातेवाईकांनी तिला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिल्यावर तत्काळ खाली उतरवून गळफास काढला. त्यावेळी पूजा बेशुद्ध अवस्थेत होती. तिला त्वरित सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना रात्री ८ च्या सुमारास तिचा मृत्यू झाला.