द्राक्ष उत्पादन विलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्राक्ष उत्पादन विलंब
द्राक्ष उत्पादन विलंब

द्राक्ष उत्पादन विलंब

sakal_logo
By

बाजारपेठेत द्राक्षाची आवक होण्यास विलंब
कोल्हापूर, ता. ३ ः गेल्या वर्षी हवामानाने दिलेल्या फटक्यामुळे द्राक्ष हंगामावर परिणाम झाला. त्याचा फटका यंदाच्या हंगामालाही बसला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी छाटणी उशिराने केली. त्यामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात बाजारपेठेत द्राक्ष आवक होण्‍यास विलंब होत आहे. यंदा हवामानाची चांगली साथ असूनही डिसेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी पूर्ण क्षमतेने द्राक्ष आवक बाजारपेठेत झालेली नाही. असे कोल्हापूर बाजारपेठेत द्राक्षाचे भाव २५० ते ३५० रुपये बॉक्सला भाव आहे. त्यामुळे भाव वाढल्याच्या काळात द्राक्ष आवक वाढणे अपेक्षित आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या राजर्षी शाहू मार्केट यार्डात द्राक्षांची आवक होते. येथे द्राक्षाचे सौदे होतात. येथून बहुतांश माल ग्रामीण भागात तसेच कोकण-गोव्यात पाठविला जातो. पूर्ण क्षमतेने द्राक्ष आवक होण्यासाठी महिनाभराचा विलंब लागेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तोपर्यंत कोकणात पर्यटन हंगाम सुरू असल्याने शनिवार- रविवार द्राक्षांची मागणी येत आहे. मात्र, माल नसल्याने तो पाठविता येत नाही. यात व्यापाऱ्यांचे व पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे.
कोल्हापुरात जवळपास ४० मोठे एजंट आहेत. त्यांच्याकडे तासगाव, अंजनी, इस्लामपूर, वाळवा, आष्टा, कवठेमहांकाळ, शिरढोण ते बार्शी, सांगोला, पंढरपूर, बारामती, इंदापूर भागातील द्राक्षांची मोठ्या प्रमाणात आवक होते. दरवर्षी डिसेंबरमध्ये किमान दिवसाला २०० बॉक्स आवक होते. मात्र, या वेळी अवघा दहा टक्केही माल नाही. एक गाडी दोन दिवसांसाठी भाड्याने घेऊन माल कोल्हापुरात आणला जातो. या उलट शाहू मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात मात्र पुरेक्षा प्रमाणात द्राक्ष आवक झालेली नाही.

कोट
द्राक्ष पिकांसाठी यंदा हवामानाची साथ चांगली आहे. मात्र, गेल्या वर्षी अवकाळी पावसाने बागांचे नुकसान झाले. त्यामुळे छाटणीला विलंब झाला. यंदा त्यामुळे यंदा माल तयार होण्यास विलंब होत आहे. परिणामी, बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्षे आलेली नाहीत. काही मोठ्या बागायतदारांचा माल मुंबई-पुणे बाजारपेठेकडे जात आहे. तिथे भावही चांगला मिळतो. कोल्हापुरात आणखी चांगला भाव मिळाल्यास पुढीस दहा-पंधरा दिवसांत पूर्ण क्षमतेने येऊ शकेल.
- बाळासाहेब वहिवाटे, द्राक्ष उत्‍पादक शेतकरी, शिरढोण