
बंगळूर, लसीकरण
‘जेई एन्सेफलायटीस’वर
नियंत्रणासाठी लसीकरण
सुधाकर ः शाळांमध्ये आठवड्याभरात अभियान
बंगळूर, ता. ४ : जेई मेंदू ताप (जॅपनीज एन्सेफलायटीस) नियंत्रित करण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम पाच डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या तापामुळे मुलांमध्ये चिंता, कमजोरी आणि मानसिक मंदता यांसह कायमचे अपंगत्व येते. या मोहिमेंतर्गत एक ते १५ वर्षे वयोगटातील अंदाजे ४८ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य व वैद्यकीय मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
जेई ब्रेन फिव्हरला ‘प्लेविव्हायरस’ म्हणतात. हा क्युलेक्स डासांद्वारे पसरतो. डुक्कर आणि जंगली पक्ष्यांमध्ये आढळणाऱ्या या विषाणूसाठी मानव हे निश्चित यजमान आहेत. जेई लसीकरण मोहिमेची माहिती देताना मंत्री म्हणाले की, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये लसीकरण करण्याच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. येत्या दोन आठवड्यांत सर्व आरोग्य संस्था, अंगणवाडी केंद्र व समाजातील इतर भागात लसीकरणाची व्यवस्था करण्यात येत आहे. केंद्र सरकारने जेनवॅक जेई लसींचा मोफत पुरवठा केला आहे.