ग्रामपंचायत निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक

sakal_logo
By

ग्रामपंचायत निवडणूक ....लोगो करावा
----------
माघारीसाठी गळ, मनधरणीला वेळ
गडहिंग्लज तालुका : गावगाडा हाकण्यास सरसावले हजारावर इच्छुक
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : तालुक्यात ८९ पैकी ३४ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरले, बुधवारी (ता. ७) माघारीचा अंतिम दिवस आहे. समोरील उमेदवाराच्या माघारीसाठी जोडण्या लावली जात आहेत. लढत सोपी होण्याच्यादृष्टीने प्रत्येक इच्छुकाकडून वेगवेगळ्या माध्यमातून गळ टाकला जात असला तरी माघार घेणाऱ्या‍ची मनधरणी करण्यास वेळ लागत आहे. परिणामी संबंधितांना त्यासाठीची तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गडहिंग्लजमध्ये निवडणूक लागलेल्या ३४ पैकी महागाव, भडगाव, नेसरी, हिटणी, कौलगे, कडगाव, मुगळी, बड्याचीवाडी ही गावे मोठी आहेतच, शिवाय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. यामध्ये बहुतांश गावे तालुका पातळीवरील कार्यरत पुढाऱ्यांची आहेत. यामुळे गाव ताब्यात ठेवण्यासाठी हे पुढारी ताकदीनिशी सरसावले आहेत. बटकणंगले व कडलगे या दोन गावांनी थेट सरपंचपदाची निवडणूक असतानाच्या परिस्थितीतही ग्रामपंचायत बिनविरोध करून गावात सामाजिक सलोखा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. इतर गावांसमोर या दोन गावांनी आदर्श ठेवला.
दुसऱ्या बाजूला प्रत्येक गावात सरपंच व सदस्य पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. बुधवारी (ता. ७) माघारीचा अंतिम दिवस. निवडणुकीत जड जाणाऱ्यां‍ची उमेदवारी छाननीत बाद ठरवण्यासाठी काही क्लृप्त्याही लढविल्या जात आहेत. लढत अधिकाधिक सोपी आणि कमी खर्चात होण्यासाठी काही इच्छुकांकडून आपल्या समोरच्याला माघार घ्यायला लावण्यास वेगवेगळी फिल्डिंग रचली जात आहे. पक्षाचे नेते, मित्र, पाहुणे, नातेवाइकांना पुढे करून संबंधितांच्या माघारीसाठी जोरात मनधरणी केली जात आहे. भविष्यातील पुनर्वसनाच्या आश्‍वासनासह पैशाचा प्रयोगही होत असल्याची चर्चा आहे. तरीसुद्धा माघारीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाऊबंदकी, जातीपातीचे राजकारण गावगाड्याच्या निवडणुकीत उफाळण्याची शक्यता आहे, परंतु थेट सामान्य जनतेशी संपर्क ठेवून अडीनडीला मदतीला धावणाऱ्या‍ कार्यकर्त्यांना गावची निवडणूक सोपी मानली जात आहे.

चौकट...
* खुल्या मैदानात वाढले पैलवान
३४ पैकी ९ ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुले आहे. बेकनाळ, हसूरसासगिरी, कळवीकट्टेत प्रत्येकी चार, करंबळी व हडलगेत प्रत्येकी ९, महागावात १०, वैरागवाडीत ६, बड्याचीवाडीत १६, मुगळीत ८ इच्छुकांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

* दृष्टिक्षेपात निवडणूक
- एकूण ग्रामपचांयती : ३४
- थेट सरपंच : २४, प्राप्त अर्ज : १९२
- सदस्य : ३००, प्राप्त अर्ज : १०७१