Sun, Jan 29, 2023

११० विद्यार्थांची रक्त तपासणी
११० विद्यार्थांची रक्त तपासणी
Published on : 5 December 2022, 12:05 pm
११० विद्यार्थांची रक्त तपासणी
आजरा ः येथील आजरा महाविद्यालयात रक्तचाचणी शिबिर झाले. जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून शिबिरात ११० विद्यार्थ्यांची रक्त चाचणी झाली. आजरा महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय आजरा यांच्या वतीने हा उपक्रम झाला. रेड रिबन क्लबचे सहकार्य लाभले. प्रा. रणजित पवार यांनी स्वागत केले. समुपदेशक उदय किल्लेदार, प्राचार्य सादळे यांनी मार्गदर्शन केले. ताहीर शेख, स्वप्नाली भगत, बिस्मिल्ला वाटंगी यांनी रक्त संकलन केले. डॉ. धनंजय पाटील यांनी आभार मानले.